Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 कारण परमेश्वरप्रेरित संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश सांगितला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:21
29 Iomraidhean Croise  

“याहवेहचा आत्मा माझ्याद्वारे बोलला आहे; त्यांचे वचन माझ्या जिभेवर होते.


याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.


ती एलीयाहला म्हणाली, “अहो परमेश्वराच्या मनुष्या, तुम्ही माझ्याविरुद्ध आहात काय? माझ्या पापाची मला आठवण करून द्यायला व माझ्या मुलाला मारून टाकण्यास आला आहात काय?”


तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.”


तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”


ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.”


ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.


परमेश्वराच्या मनुष्याने सांगितलेले ठिकाण इस्राएलच्या राजाने पडताळून पाहिले. अलीशाने राजाला वारंवार सावध केले, जेणेकरून तो अशा ठिकाणी सावध राहिला.


दुसर्‍या दिवशी पहाटेच परमेश्वराच्या मनुष्याचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैनिकांनी रथ आणि घोडे यासह शहराला वेढा दिला आहे, हे त्याला दिसले. तेव्हा तो ओरडला, “माझ्या स्वामी, आता आपण काय करावे?”


परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता.


त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली.


हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात?


बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.


यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.


द्रष्ट्यांना लाज वाटेल आणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील. ते सर्व आपली मुखे झाकतील कारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही.”


त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल:


कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’


जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—


तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते.


त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे:


परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले.


परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.


याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले:


ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,


या सर्व गोष्टींवरून पवित्र आत्मा आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की जोपर्यंत जुना मंडप आणि त्यातील कार्यक्रम चालू होते तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता.


यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे.


त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.


तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan