Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परमेश्वर आणि आपले येशू प्रभू यांच्या ज्ञानाद्वारे कृपा व शांती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:2
18 Iomraidhean Croise  

वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.


नबुखद्नेस्सर राजाने, जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: तुम्हा सर्वांची भरभराट होवो.


नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्‍यांना लोकांना लिहिले: “तुमची भरपूर उन्नती होवो!


“माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणी ओळखत नाही आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय आणि पुत्र ज्यांना प्रकट करण्यास निवडतो त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”


आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.


रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे: परमेश्वर जे आपले पिता व येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.


कारण, “अंधकारातून प्रकाश हो,” असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात दिला आहे.


यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्‍यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे.


जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले: तुम्हाला भरपूर कृपा व शांती असो.


त्यांच्या दैवी सामर्थ्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यास पाचारण केले, त्यांच्या ज्ञानाद्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्वगोष्टी आपल्याला दिल्या आहेत.


कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची;


कारण जर हे गुण तुमच्यामध्ये वाढत असले तर ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात तुम्हाला निष्क्रिय व निष्फळ होण्यापासून राखतील.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.


परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन.


दया, शांती आणि प्रीती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.


योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यास: जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो


Lean sinn:

Sanasan


Sanasan