Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 म्हणून आम्हांला अधिक खात्री वाटते की, संदेष्ट्यांचे वचन जे आमच्याजवळ आहे, ते काळोखात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल, तर बरे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:19
27 Iomraidhean Croise  

तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.


कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत.


पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!


हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल, किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’ कोणीही हे सांगितले नाही, कोणीही हे भविष्य केले नाही, कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही.


परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही.


अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर प्रकाश उदय पावला आहे.


अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.”


योहान एक ज्वलंत दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचे मान्य केले.


तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात;


येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा.


आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.


कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली.


“जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता.


तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने,


जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही;


त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव व्हावे.


ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन.


“तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan