Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मला असे वाटते की, जोपर्यंत मी या शारीरिक तंबूमध्ये राहत आहे, तोपर्यंत तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी करणे हे योग्य आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी ह्या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तरी मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हांला त्याची आठवण देऊन जागृत ठेवणे, हे मला उचित वाटते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:13
11 Iomraidhean Croise  

मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले.


याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली.


आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा.


तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्या हृदयात तुम्हाला स्थान आहे. मी तुरुंगात होतो अथवा शुभवार्तेची पुष्टी करीत व प्रमाण देत होतो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर परमेश्वराच्या कृपेमध्ये सहभागी झाला होता.


मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे.


म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे.


तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.


जरी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत आणि तुमच्याकडे असलेल्या सत्यात तुम्ही निश्चितपणे स्थिर झालेले आहात, तरी या गोष्टींची मी तुम्हाला नेहमीच आठवण करून देईन.


कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे, जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे.


प्रिय मित्रांनो, आता माझे हे तुम्हाला दुसरे पत्र आहे. या दोन्ही पत्राद्वारे मी तुम्हाला आठवण देऊन तुमच्या विचारांना हितकारक होतील अशा गोष्टींना चालना देत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan