Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 योहान 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण पारितोषिक तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 योहान 1:8
20 Iomraidhean Croise  

जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.


येशूंनी त्यांना म्हटले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा.


म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे.


“तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल आणि माझ्यामुळे तुम्हाला राज्यपाल आणि राजे त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल.


“त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’


येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसविले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मीच तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका.


आता कापणार्‍याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्‍याने व कापणार्‍यानेही एकत्रित मिळून आनंद करावा.


सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.


बांधलेले टिकून राहिले, तर बांधकाम करणार्‍याला त्याचे प्रतिफळ मिळेल.


जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल.


इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते?


तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.


जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे.


जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा.


तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.


परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.


मी लवकर येत आहे. तुमचा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुमच्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan