स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो.
जरी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत आणि तुमच्याकडे असलेल्या सत्यात तुम्ही निश्चितपणे स्थिर झालेले आहात, तरी या गोष्टींची मी तुम्हाला नेहमीच आठवण करून देईन.
प्रिय मुलांनो मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही त्यांना ओळखता जे सुरुवातीपासून आहेत. तरुणांनो मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही सशक्त आहात आणि परमेश्वराचे वचन तुम्हामध्ये राहते, आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.