Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15-16 परमेश्वर जे योग्य समयी त्याला पूर्ण करतील, परमेश्वर जे धन्यवादित व एकच सर्वसमर्थ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जे अगम्य प्रकाशात राहतात, ज्यांना कोणीही पाहिले नाही, आणि कोणीही पाहू शकत नाही; त्यांना सदासर्वकाळ गौरव आणि चिरकाल सामर्थ्य असो. आमेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 6:15
16 Iomraidhean Croise  

राजांचा राजा, जो अर्तहशश्त याजकडून, स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक एज्रा याजक यास: शुभेच्छा.


प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.


कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.


त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.


माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात;


परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


“ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.


निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची सत्ता शाश्वत आहे. त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे.


आणि आम्हास परीक्षेत आणू नका, परंतु त्या दुष्टापासून आम्हास सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुमचेच आहेत. आमेन’


याहवेह तुमचे परमेश्वर, हे देवाधिदेव, प्रभूंचे प्रभू, महान परमेश्वर, पराक्रमी आणि भयावह आहेत, जे पक्षपात करीत नाहीत व लाच घेत नाहीत.


जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे.


जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.


त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय.


ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”


त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.


Lean sinn:

Sanasan


Sanasan