Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 परंतु जी विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:6
29 Iomraidhean Croise  

परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”


ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, तर मोठेपणी तो उद्धट होईल.


परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”


“हे कुमारी खाल्डियन कन्ये, सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, सिंहासन सोडून जमिनीवर बस. तू यापुढे कोमल व नाजूक म्हणविली जाणार नाहीस.


सीयोनाच्या सुंदर आणि सुकुमार कन्येला मी उद्ध्वस्त करेन.


उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.


येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.”


आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’


“काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला, तिथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला.


कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला.


हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”


येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे.


जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात.


तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.


आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.


त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.”


तुमच्यातील अत्यंत कोमलहृदयी व सुसंस्कृत पुरुषाला देखील आपला भाऊ, आपली प्राणप्रिय पत्नी आणि जगून वाचून राहिलेल्या मुलांवरही दयामाया येणार नाही,


ऐश्वर्यसंपन्न असल्यामुळे जिने आपला तळवाही कधी जमिनीला लावला नाही अशी घरंदाज व कोमलहृदयी पत्नी इतकी कठोरहृदयी बनेल की आपला प्राणप्रिय पती, पुत्र किंवा कन्या यांना ती आपल्या अन्नाचे वाटेकरी होऊ देणार नाही,


जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली.


ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील.


पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी धष्टपुष्ट केले आहे.


तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”


“सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, ते असे म्हणतात: तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत, तुम्ही जिवंत आहात असे तुमच्याविषयी मत आहे, पण तुम्ही मेलेले आहात.


नंतर शमुवेल म्हणाला, “अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्याकडे घेऊन या.” अगाग साखळ्यांनी बांधलेला असा शमुवेलकडे आला आणि त्याला वाटले, “मरणाचे संकट खात्रीने टळले आहे.”


त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो!


Lean sinn:

Sanasan


Sanasan