Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरातल्या कुटुंबीयांबरोबर धार्मिकतेने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे; कारण हे देवाला आवडते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:4
18 Iomraidhean Croise  

योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.


इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती.


त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत, तो जिथे राहत होता, तिथेही कोणी उरले नाहीत.


तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:


सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “मी त्यांच्याविरुद्ध उठेन, बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले, तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,” असे याहवेह घोषित करतात.


नंतर ते आईवडिलांबरोबर नासरेथला आले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांच्या आईने या सर्वगोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या.


असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो.


जर कोणी विश्वासी स्त्री विधवांची काळजी घेत आहे, तर तिने त्यांची मदत करीत राहावे आणि मंडळीवर त्यांचे ओझे टाकू नये म्हणजे ज्या विधवा खरोखर गरजवंत आहेत, त्यांना मंडळी मदत करू शकेल.


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; कारण अप्रामाणिक लाभासाठी जे शिकवू नये ते शिकवून ते संपूर्ण घराण्यांची उलथापालथ करीत आहेत.


त्याला चाळीस पुत्र आणि तीस नातू होते, ते सत्तर गाढवांवर स्वार होते. त्याने आठ वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.


ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले.


आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan