Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जे वडील पाप करीत असतात त्यांचा सर्वांच्यासमक्ष निषेध कर म्हणजे इतरांना त्याचे भय राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणार्‍यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 इतरांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:20
15 Iomraidhean Croise  

“ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्‍याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही.


या घटनेची वार्ता लागलीच सर्व इफिसमध्ये राहणारे यहूदी व ग्रीक यांना कळली, तेव्हा त्या सर्वांमध्ये भीती निर्माण झाली आणि प्रभू येशूंचे नाव अत्यंत आदरणीय मानले गेले.


सर्व मंडळी आणि ज्या सर्वांनी हे ऐकले ते सारे भयभीत झाले.


हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले.


या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे.


अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा.


तेव्हा संपूर्ण इस्राएल ऐकेल व भयभीत होईल आणि तुमच्यामध्ये असा दुष्टपणा करण्यास कोणी धजणार नाही.


हे सर्व लोक ऐकतील व भयभीत होतील आणि पुढे ते उन्मत्तपणा करणार नाहीत.


इतर लोक हे ऐकतील व भयभीत होतील आणि तुम्हामध्ये अशी दुष्टाई पुन्हा कधीही घडणार नाही.


मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.


हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.


तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.


हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील,


अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan