Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 ज्येष्ठ माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून त्याचा आदर कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:1
26 Iomraidhean Croise  

“ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे.


“परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात.


पौल आणि बर्णबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या प्रभूला त्यांचे समर्पण केले.


जेव्हा ते यरुशलेममध्ये आले, तेथील मंडळी, प्रेषित व वडीलजनांनी त्यांचे स्वागत केले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्या सेवेद्वारे केले होते, याची सविस्तर माहिती पौल व बर्णबाने त्यांना दिली.


प्रेषित आणि पुढारी या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्रित भेटले.


मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला.


प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.


प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल.


आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.


जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.


वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.


वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.


तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर.


परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.


तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी.


तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो:


मंडळीचा वडील याजकडून, एक स्त्री जिची परमेश्वराकडून निवड झालेली आहे, ती आणि तिची मुले यांच्यासाठी ज्यांच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो आणि केवळ मीच नाही परंतु ते सर्वजण ज्यांना सत्याची ओळख झाली आहे,


मंडळीचा वडील याजकडून, माझ्या प्रिय मित्र गायसला, ज्याच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो.


राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan