Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ज्या लबाड बोलणार्‍या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ज्यांची सदसद्विवेकबुद्धी तप्‍त लोखंडाने डाग देऊन मारून टाकल्यासारखी झाली आहे, असे लबाड लोक ही खोटी शिकवणूक पसरवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 4:2
18 Iomraidhean Croise  

त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)


“याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ “तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील. जा आणि तसे कर.’


वडीलजन आणि मान्यवर लोक हे मस्तक आहेत, खोटे शिक्षण देणारे संदेष्टे हे शेपूट आहेत.


आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात मी काही भयानक गोष्टी बघितल्या: ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”


हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात?


जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


ऐका, अहो मूर्खानो व बुद्धिहीन लोकांनो, तुम्हाला डोळे आहेत तरी तुम्हाला दिसत नाही, कान आहेत तरी तुम्हाला ऐकू येत नाही:


कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.


“खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात.


प्रत्यक्ष तुमच्या गटामधून काही माणसे उठतील व त्यांना अनुयायी मिळावेत व त्यांचे शिष्य व्हावेत म्हणून सत्य विपरीत करतील.


यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.


कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.


आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्‍हेतर्‍हेच्या शिक्षणरूपी वार्‍याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये.


सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत.


ते भक्तीचा देखावा करतील, परंतु त्याच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा.


चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan