Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल म्हणून या गोष्टींचे चिंतन कर, यामध्ये तत्पर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्या अमलात आण.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 4:15
26 Iomraidhean Croise  

पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.


माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.


परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.


मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन.


मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो.


अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात, तरी तुमचा सेवक तुमच्या विधींचे मनन करेल.


मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन, जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन.


अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो.


मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो.


मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.


याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.


माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात; माझ्या अंतःकरणाचे मनन सुज्ञतेचे असणार.


माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.


मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.”


त्यांनी सभामंडपात आपल्या बांधवांना त्यांच्या कार्यात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः काम करू नये. याप्रकारे तू लेवी लोकांची कामे नेमून द्यावी.”


याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.


आणि मग प्रार्थनेकडे व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.”


तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो,


आम्हाला हे माहीत आहे की, ज्यांनी प्रभू येशूंना मेलेल्यांमधून जिवंत केले, तेच आम्हालाही येशूंबरोबर पुन्हा जिवंत करतील आणि तुमच्याबरोबरच आम्हाला स्वतःपुढे सादर करतील.


आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.


मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.


तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण करशील.


जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील.


त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.


शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan