1 तीमथ्य 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. Faic an caibideil |
तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.
त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.