Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 3:2
20 Iomraidhean Croise  

इस्राएलचे पहारेकरी आंधळे आहेत, ते सर्व ज्ञानशून्य आहेत; ते सर्व मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते पडून राहतात व स्वप्ने पाहतत, त्यांना झोपायला फार आवडते.


दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.


त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.


जे गरजवंत असे प्रभूचे लोक आहेत, त्यांना द्या. आदरातिथ्य करा.


म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्‍यांप्रमाणे चमकाल.


सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा.


मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे.


हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्‍यांनी आणि सत्य जाणणार्‍यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील.


जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.


अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख.


जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे,


प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत.


वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.


अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.


जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे.


सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल.


कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा.


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan