1 तीमथ्य 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
16 परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते.
16 तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.
16 परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे.
16 जे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर पुढे विश्वास ठेवणार आहेत, त्यांना दाखला मिळावा म्हणून, मी जो सर्वांत अधिक पापी, त्या माझ्या बाबतीत येशू ख्रिस्ताने सर्वात जास्त धीर दाखवावा ह्याच कारणाकरिता माझ्यावर दया करण्यात आली.
त्याची प्रार्थना आणि त्याच्या कळकळीच्या विनवणीमुळे परमेश्वर दयेने कसे हेलावून गेले, तसेच त्याची सर्व पापे आणि अविश्वासूपणा आणि जिथे घटनास्थळे आहेत, तिथे त्याने उच्च स्थाने बांधली आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती स्थापित केल्या, स्वतःला नम्र करण्याआधी केलेल्या या सर्व गोष्टी संदेष्ट्यांच्या घटनांची नोंद यामध्ये लिहिलेल्या आहेत.
“या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.
दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.
मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.
यास्तव मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतीमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतीही थोडीच असते.”
परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे.
जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील.
“मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे.
कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”
जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते.
कारण जे काही पूर्वी लिहिण्यात आले, ते सर्व आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून लिहिले गेले, यासाठी की धीर धरून शास्त्रलेखापासून मिळणार्या प्रोत्साहनाद्वारे आपण आपल्या आशेला दृढ धरून राहवे.
त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले.
यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत.
ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते.
आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा.
कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.