Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 1:13
25 Iomraidhean Croise  

मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”


परंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे.


“ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.


“मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही.


तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.


ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला. स्त्री व पुरुष या दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो.


“आता, इस्राएली बंधूंनो, मला माहीत आहे की तुम्ही जे केले, ते अज्ञानाने केले आणि तुमच्या पुढार्‍यांनीही तेच केले.


परंतु शौलाने मंडळीचा नाश करण्यास सुरुवात केली. तो घरोघरी जाऊन, स्त्री व पुरुष दोघांनाही खेचून तुरुंगात घालीत असे.


इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वासागणीक प्रभूच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो महायाजकाकडे गेला


हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे.


शौलाने विचारले, “प्रभूजी, आपण कोण आहात?” “ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे,


कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला.


आता कुमारिकांबद्दल: मला प्रभूकडून आज्ञा मिळालेली नाही, तरीपण प्रभूच्या कृपेनुसार मी जो विश्वसनीय आहे तो मी माझा न्याय देतो.


कारण तुम्ही ऐकलेच आहे की, यहूदी धर्मात असताना माझे पूर्वीचे जीवन कसे होते, कशाप्रकारे उग्र रूप धारण करून मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला आणि त्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न केला.


आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो.


परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते.


तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.


पूर्वी तुम्ही ते लोक नव्हता परंतु आता तुम्ही परमेश्वराचे लोक आहात; पूर्वी तुम्हाला दया प्राप्त झाली नव्हती, परंतु आता तुम्हाला दया प्राप्त झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan