Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 परंतु बंधुंजनहो, त्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठावे, असे तुम्ही अंधारात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 5:4
17 Iomraidhean Croise  

तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल.


“हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस आणि तू तिथेच राहिला. गिबियाहच्या दुष्कृत्य करणाऱ्या विरुद्ध पुन्हा युद्ध भडकणार नाही काय?


पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना? “तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ”


मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.


“सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल.


यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’


नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्‍याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.


परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:


हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले.


कारण अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,


कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल.


परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.


तरी मी तुम्हास एक नवी आज्ञा लिहित आहे; तिचे सत्य त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दिसून येत आहे, कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आताच प्रज्वलित झाला आहे.


“पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.”


जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan