Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतर गोष्टीसंबंधाने आम्ही तुम्हाला आज्ञा केली होती की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कसे जीवन जगावे आणि ते तुम्ही जगतच आहात आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो व प्रभू येशूंमध्ये विनंती करतो की तुम्ही अधिकाधिक वाढ करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे1 हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात; त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 4:1
44 Iomraidhean Croise  

परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले.


तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.


वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.


नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे.


माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.


कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.


जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत.


जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली,


आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात.


यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.


ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो.


शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.


तेव्हा, आम्ही येथे या शरीरामध्ये असू अथवा या शरीरापासून दूर असू, आम्ही करतो त्या सर्व गोष्टींत प्रभूंना संतोष देणे, हेच आमचे ध्येय आहे.


परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका.


प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल.


प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे.


पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर,


मुर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या.


पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,


आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी.


ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.


त्यामुळे प्रभूला आवडेल असे योग्य जीवन तुम्ही जगावे व प्रत्येक बाबतीत त्यांना प्रसन्न करावे. चांगल्या कृत्यांद्वारे फळ देणारे, परमेश्वराच्या ज्ञानात वाढणारे,


तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा.


प्रभू असे करो की जशी आम्ही तुमच्यावर करतो तशी तुमची प्रीती वाढावी आणि एकमेकांसाठी ओसंडून वाहावी.


आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत.


बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा.


बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा येणे व आपले त्यांच्याजवळ एकवटणे यासंबंधी बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगतो,


आता इतर गोष्टीसंबंधाने, बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूचा संदेश वेगाने पसरावा व त्यास सन्मान मिळावा.


बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका.


परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आणि निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, या सूचना कोणताही भेदभाव न करता पाळ. पक्षपाताने काहीही करण्यात येऊ नये.


परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की:


विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.


चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.


बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे.


परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन.


आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan