Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 ह्यामुळे मलाही आणखी धीर धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याकरिता तीमथ्यला पाठविले. सैतानाने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ होतील अशी मला भीती वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 3:5
20 Iomraidhean Croise  

मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले. मी माझे सामर्थ्य निरुपयोगीच खर्ची घातले, तरीपण माझे प्रतिफळ म्हणजे याहवेहचा वरदहस्त आणि माझे बक्षीस माझ्या परमेश्वराकडे आहे.”


राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला.


मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”


काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्‍यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.”


एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही.


यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये; कारण त्याचे डाव आपल्याला कळत नाहीत असे नाही.


परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका.


मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्‍यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो.


तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.


आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्‍हेतर्‍हेच्या शिक्षणरूपी वार्‍याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये.


तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल.


मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन.


प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणे काही व्यर्थ ठरले नव्हते हे तुम्हाला माहीतच आहे.


तीमथ्य तुमच्याकडून नुकताच आम्हाकडे परतला असून त्याने तुमचा विश्वास आणि प्रीती याबद्दल चांगली बातमी दिली आहे आणि आमच्याबद्दल तुम्हाला गोड आठवणी आहेत व तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जसे उत्कंठित आहोत, तसेच आम्हाला भेटण्यासाठी तुम्हीही उत्कंठित आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan