1 थेस्सल 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
13 आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.
13 ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.
13 ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.
13 अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.
तुम्ही माझ्या खोर्यातून पळ काढाल, कारण ते खोरे आझल नगरीच्या वेशीपर्यंत भिडेल. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी तुमचे लोक, यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या काळात भूकंप झाला होता तेव्हा निसटून गेले होते, त्याचप्रमाणे तुम्हीही निसटून जाल आणि मग याहवेह, माझे परमेश्वर येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व पवित्रजनही येतील.
ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या गौरवात व पवित्र देवदूतांच्या समवेत परत येईन तेव्हा लाज वाटेल.”
दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
माझ्या शुभवार्तेनुसार तो आता तुम्हाला स्थिर करेल व ज्या येशू ख्रिस्ताचा संदेश मी घोषित केला त्यानुसार जे रहस्य अनंत काळापूर्वी गुपित होते ते आता प्रकट झाले आहे.
तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.
परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक दोषरहित सादर करावे;
ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रसार कार्य करणारा आमचा बंधू आणि परमेश्वराच्या सेवेतील सहकर्मी असलेला तीमथ्य, त्याने तुम्हाला विश्वासात बळकट व प्रोत्साहित करावे म्हणून आम्ही त्याला पाठविले आहे.
स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही.
परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत.
त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील.