Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आम्ही तुमच्यासाठी रात्र आणि दिवस फार आग्रहाने प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला लवकरच भेटावे आणि तुमच्या विश्वासामध्ये जे काही उणे असेल ते पूर्ण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हास तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासांतील उणे आहे ते पूर्ण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 आम्ही रात्रंदिवस अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला प्रत्यक्ष पाहावे आणि तुमच्या विश्वासातील उणिवा दूर कराव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 3:10
19 Iomraidhean Croise  

आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.


आमचे बारा वंश अभिवचन पूर्ण होण्याची आशा बाळगत परमेश्वराची सेवा मनःपूर्वक रात्रंदिवस करीत आहेत. तरी महाराज अग्रिप्पा, त्याच आशेमुळे मजवर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.


या गोष्टीचा मला भरवसा होता की मी प्रथम तुमची भेट घ्यावी यासाठी की तुम्हाला दोनदा लाभ व्हावा.


तुमच्या विश्वासावर अधिकार दाखवावा म्हणून नव्हे, कारण विश्वासामुळेच तुम्ही स्थिर आहात, परंतु आम्ही तुमच्याबरोबर सहकर्मी होऊन आनंदासाठी परिश्रम करतो.


शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.


तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे.


मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन.


ते हेच आहे ज्याची आम्ही घोषणा करतो व बोध करून ज्ञानाने प्रत्येकास शिकवितो, यासाठी की प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये परिपक्व असे सादर करावे.


जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रास, तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. तो तुमच्यासाठी नेहमी झटून प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो, की परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही परिपक्व व पूर्ण खात्री झालेले असे स्थिर उभे राहावे.


आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा.


हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो.


मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.


आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.


त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”


म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील.


माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देण्याने मी याहवेहविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. आणि मी तुम्हाला जो चांगला व खरा मार्ग तो शिकवेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan