Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा आमच्यात त्राण उरले नाही असे वाटले तेव्हा, ॲथेन्स इथे थांबून राहणे उत्तम वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनैतच एकटे मागे राहावे, हे आम्हांला बरे वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनै शहरातच एकटे मागे रहावे, हे आम्हास बरे वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 आमच्याने आणखी धीर धरवेना म्हणून अथेनैमध्येच एकटे मागे राहावे, असे आम्ही ठरविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 3:1
8 Iomraidhean Croise  

परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,” तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते, व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो. तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते. निश्चितच, मी ते करू शकत नाही.


तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.


पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.


त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला.


परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.


बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हापासून शरीराने दूर असलो, पण विचाराने नव्हे, आमच्या प्रबळ इच्छेने तुम्हाला भेटण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला.


कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan