Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 बंधू आणि भगिनींनो, आम्ही केलेले कष्ट आणि परिश्रम हे तुम्हाला आठवत असतील; परमेश्वराच्या शुभवार्तेचा प्रचार तुम्हाला करीत असताना आमचे ओझे कोणावर पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 बंधूनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस उद्योग करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 बंधुंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुमच्यातील कुणावर आमचा भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:9
35 Iomraidhean Croise  

चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या.” आणि तो म्हणाला, “जा.”


पण माझ्यापूर्वी असलेल्या राज्यपालांनी लोकांवर फारच जड ओझी लादली आणि त्यांच्याकडून अन्न व द्राक्षारसाशिवाय चांदीची चाळीस शेकेल यांची मागणी ते करीत असत. त्यांचे उपाधिकाराही प्रजेचे शोषण करीत. परंतु मी परमेश्वराच्या भयात राहून त्यांच्याप्रमाणे वागलो नाही.


दररोज एक बैल, सहा पुष्ट मेंढरे, काही पक्षी यापासून बनविलेले अन्न माझ्यासाठी शिजविण्यात येत असे. तसेच दर दहा दिवसांनी मी त्यांना सर्वप्रकारचे द्राक्षारस विपुल प्रमाणात पुरवित असे. इतके असूनही राज्यपालांना जो भोजनभत्ता मिळण्याचा हक्क होता, तो मी कधीही मागितला नाही, कारण या सेवा लोकांना भारी पडत होत्या.


रात्रंदिवस तुमचा हात माझ्यावर भारी होता; उष्मकालच्या उष्णतेप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली होती. सेला


हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे;


तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय?


आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.


जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले.


तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.


म्हणून आता तुम्ही सावध राहा! मी तुमच्याबरोबर तीन वर्षे रात्रंदिवस आसवे गाळून तुम्हा प्रत्येकाला सावध राहण्याविषयी सूचना देण्याचे केव्हाही थांबविले नाही, याची आठवण ठेवा.


मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला


की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.


चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.


आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो;


परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन.


माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.


आम्हाला खाण्याचा पिण्याचा अधिकार नाही काय?


मी श्रम व कष्ट केले आणि अनेकदा झोपेशिवाय राहिलो आहे. अनेक वेळा मी उपाशी व तान्हेला होतो; पुष्कळदा भोजनाशिवाय राहिलो आहे; मी थंडीने कुडकुडलो व नग्न होतो.


आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन.


आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास;


मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली.


आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.


पूर्वी फिलिप्पैमध्ये आम्हाला दुःख व अपमानकारक वागणूक सहन करावी लागली हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु आमच्या परमेश्वराच्या साहाय्याने भयंकर विरोध असतानाही आम्ही परमेश्वराची शुभवार्ता सांगण्याचे धैर्य केले.


आम्ही लोकांकडून म्हणजे, तुमच्याकडून किंवा दुसर्‍या कोणाकडूनही स्तुतीची कधीच अपेक्षा केली नाही.


आम्ही तुमच्यासाठी रात्र आणि दिवस फार आग्रहाने प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला लवकरच भेटावे आणि तुमच्या विश्वासामध्ये जे काही उणे असेल ते पूर्ण करावे.


जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे.


याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.


जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते.


मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan