Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तसेच आम्ही तुमची काळजी घेतली. आम्ही तुमच्यावर एवढी प्रीती केली की आम्ही आनंदाने केवळ परमेश्वराची शुभवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनही देण्यास तयार होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आम्हांला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 आम्हांला तुमच्याविषयी जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या शुभवर्तमानाचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या गाढ प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:8
23 Iomraidhean Croise  

तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता.


मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला


बंधूंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे.


आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे.


मी तुम्हासाठी जे काही आहे ते आनंदाने सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे आणि मला स्वतःसही खर्च करण्यास तयार आहे. जर मी तुमच्यावर अधिक प्रीती करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता का?


परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका.


माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील.


ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे.


तुमच्या विश्वासाची सेवा आणि यज्ञ यावर मी स्वतः पेयार्पण म्हणून अर्पण केला जात आहे तरी मीही तुमच्याबरोबर आनंद करेन.


तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही.


यास्तव, बंधू व भगिनींनो, जो मी तुम्हावर प्रीती करतो व तुम्हाला भेटावयास उत्कंठित आहे व जे तुम्ही माझा आनंद, मुकुट आहात, प्रभूमध्ये अशाप्रकारे स्थिर राहा.


ते हेच आहे ज्याची आम्ही घोषणा करतो व बोध करून ज्ञानाने प्रत्येकास शिकवितो, यासाठी की प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये परिपक्व असे सादर करावे.


आमचा अतिप्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही शिकला, तो आमच्यावतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे.


जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रास, तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. तो तुमच्यासाठी नेहमी झटून प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो, की परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही परिपक्व व पूर्ण खात्री झालेले असे स्थिर उभे राहावे.


ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य, आमचा प्रिय मित्र आणि सहकारी फिलेमोन—


आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.


प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan