Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 आमचे आवाहन चुकीच्या शिकवणुकीवर किंवा अनुचित उद्दिष्टांवर आधारित नसून आम्ही कोणाची फसवणूक करू इच्छीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 2:3
18 Iomraidhean Croise  

मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”


नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्‍यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”


योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते,


कारण असे लोक खोटे प्रेषित, फसविणारे कामकरी, ख्रिस्ताचे प्रेषित आहोत असा समज करून फसविणारे आहेत.


आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.


आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो.


आम्ही स्वतःविषयी प्रचार करीत नाही, तर ख्रिस्त येशू हेच प्रभू आणि आम्ही येशूंसाठी तुमचे दास आहोत.


गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले;


तुमच्या हृदयात आमच्यासाठी जागा करा. आम्ही कोणाविरुद्ध अन्याय केला नाही. आम्ही कोणालाही मार्गभ्रष्ट केले नाही किंवा कोणाचा गैरफायदा घेतला नाही.


पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे,


कारण परमेश्वराने आपल्याला अपवित्रतेसाठी नव्हे, तर पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे.


या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील,


चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत.


मी येथे तुमच्यापुढे उभा आहे. याहवेहच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या उपस्थितीत माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला आहे? मी कोणाचा गाढव घेतला आहे? मी कोणाला फसविले आहे? मी कोणावर अत्याचार केला आहे? न्याय विपरीत करण्यासाठी मी कोणाच्या हातून लाच घेतली आहे? यापैकी कोणतीही गोष्ट जर मी केली असेल तर त्याची मी भरपाई करेन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan