१ शमुवेल 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 एकदा शौलाचा बाप कीश ह्याची गाढवे चुकली तेव्हा कीश आपला पुत्र शौल ह्याला म्हणाला, “आपल्याबरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, “आता तू ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.” Faic an caibideil |
आज तू माझ्याकडून गेल्यावर, बिन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्सेह येथे राहेलच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील. ते तुला सांगतील, ‘ज्या गाढवांच्या शोधात तू बाहेर पडला होता ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दलचा विचार करण्याचे थांबविले आहे आणि तुझ्याबद्दल काळजी करीत आहेत. ते म्हणत आहेत मी, “माझ्या मुलाविषयी काय करावे?” ’