१ शमुवेल 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर आता त्यांचे म्हणणे ऐक; पण त्यांची चांगली कानउघाडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालते ते त्यांना दाखवून दे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग. Faic an caibideil |
जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.