Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा परमेश्वर शमुवेलाला म्हणाला, “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 8:7
22 Iomraidhean Croise  

परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.”


आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.”


“जे तुमचे ऐकतात, ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला नाकारतात, ते मला नाकारतात. परंतु जे मला नाकारतात, ते ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना नाकारतात.”


मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”


“परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधीमंडळ हे सांगण्यासाठी पाठविले, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’


“जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात, आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात.


मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही.


म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली आणि मला वीट आणणार्‍या गोष्टी करणे निवडले.”


त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.”


परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.”


मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत.


याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.” नंतर शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या नगराकडे परत जा.”


शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही मला जे काही सांगितले ते ऐकून मी तुमच्यावर राजा नेमून दिला आहे.


“परंतु जेव्हा तुम्ही पाहिले की, अम्मोन्यांचा राजा नाहाश तुमच्याविरुद्ध चाल करून येत आहे, तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचा राजा असतानाही, तुम्ही मला म्हणाला, ‘नाही, आमच्यावर राज्य करण्यासाठी आम्हाला राजा पाहिजे.’


‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही.


तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.


परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan