Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएली लोकांना मिस्पाह येथे जमा करा, म्हणजे मी याहवेहकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना मिस्पात जमा करा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:5
18 Iomraidhean Croise  

आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”


यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.”


जेव्हा सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने गदल्याहची राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कारेहचा पुत्र योहानान, नटोफाथी तन्हुमेथचा पुत्र सेरायाह आणि माकाथीचा पुत्र याजन्याह आणि त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.


याच महिन्याच्या चोवीस तारखेला, इस्राएली एकत्र आले. यावेळी त्यांनी उपास केला व गोणपाट पांघरूण त्यांनी आपल्या डोक्यावर धूळ घातली


तेव्हा यिर्मयाह मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहकडे गेला व देशातील उरलेल्या लोकांमध्ये राहिला.


“तुम्ही याजकांनो, हे ऐका! अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या! राजघराणे, ऐका! हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे: मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात, ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.


लोकांना एकत्र करा, सभेला पवित्र करा; वडिलजनांना एकत्र आणा, बालकांना आणि स्तनपान करणार्‍या अर्भकांना देखील एकत्र आणा. वराला त्याच्या निवासस्थानातून आणि वधूला तिच्या खोलीतून बोलवा.


दिलआन, मिस्पेह, योकथएल,


मिस्पेह, कफीराह, मोजाह,


जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला.


तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले.


शमुवेलने इस्राएली लोकांना याहवेहकडे मिस्पाह येथे बोलाविले


हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”


माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देण्याने मी याहवेहविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. आणि मी तुम्हाला जो चांगला व खरा मार्ग तो शिकवेन.


नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर असे नाव दिले.


प्रतिवर्षी तो बेथेल, गिलगाल, मिस्पाह येथे अनुक्रमाने इस्राएलचा न्याय करीत फिरत असे.


त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्या अष्टारोथ व बआलांच्या मूर्ती टाकून दिल्या आणि केवळ याहवेहची सेवा केली.


परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan