Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने याहवेहकडे परत वळत आहात, तर तुम्ही अन्य दैवते व अष्टारोथचा त्याग करा; आणि याहवेहकडे चित्त लावून केवळ त्यांचीच सेवा करा; म्हणजे याहवेह तुम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून सोडवतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला, “जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:3
40 Iomraidhean Croise  

म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.


मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.


आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,


तुम्ही फक्त याहवेह तुमच्या परमेश्वराचीच उपासना करावी; तेव्हा ते तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवितील.”


बेथेल येथे उभारलेली वेदी, टेकड्यांवरील मंदिरे, नेबाटाचा पुत्र यरोबोअमद्वारे तयार करण्यात आलेली वेदी, ज्याद्वारे इस्राएली लोकांनी पाप केले होते ती आणि टेकड्यांवरील मंदिरे पाडून टाकली. त्याने त्या मंदिराचे धोंडे जमीनदोस्त करून त्याचा भुगा केला आणि अशेराची ओंगळ मूर्ती जाळून भस्म केली.


आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”


“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.


कसेही असले तरी, तुमच्यामध्येही काही चांगले आहे, कारण तुम्ही अशेरा खांब देशातून काढून टाकले आहेत आणि परमेश्वराचा शोध घेण्याकडे तुमचे अंतःकरण लावले आहे.”


तरी, डोंगरावरील मंदिरे नष्ट केली नव्हती आणि लोकांनी अजूनही त्यांची अंतःकरणे त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे लावली नव्हती.


जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.”


अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.


दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.


मी त्यांना असे अंतःकरण देईन जेणेकरून ते मला ओळखतील, की मीच याहवेह आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा परमेश्वर होईन, कारण ते पूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत येतील.


जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”


याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” “मग माझ्याकडे परत ये.” “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही,


“म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पश्चात्ताप करा! तुमच्या मूर्तींपासून वळा आणि आपली अमंगळ कृत्ये टाकून द्या!


तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे?


हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!


“ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.


येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”


“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्‍यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्‍याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.


येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”


परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”


याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.


याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.


परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.


तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी.


अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे). मनश्शेहचा पुत्र माखीरच्या वंशजांना; माखीरच्या पुत्रांपैकी अर्ध्यांना त्यांच्या कुळाप्रमाणे हे देण्यात आले.


“तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा.


तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.”


नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.


इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.


तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली.


कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली.


त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शरीर बेथ-शान नगराच्या भिंतीवर टांगले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan