Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शमुवेल होमार्पण करत असताना, पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी युद्ध करावयाला जवळ आले. तेव्हा याहवेहने प्रचंड गडगडाटाने गर्जना करून पलिष्ट्यांना असे भयभीत केले की, इस्राएली लोकांपुढे त्यांचा बीमोड झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शमुवेल होमार्पण करत असताना पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ येऊन ठेपले; त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांना घाबरे केले, आणि इस्राएलापुढे त्यांचा मोड झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 7:10
21 Iomraidhean Croise  

जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”


हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”


आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.


मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले.


मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.


जसा बाराक पुढे गेला, याहवेहने सिसेरा आणि त्याचे सर्व रथ आणि त्याच्या सैनिकांचा तलवारीने धुव्वा उडविला, सिसेरा तर आपल्या रथातून उतरला आणि पायी पळून गेला.


तेव्हा इस्राएली लोक मिस्पाहातून पलिष्ट्यांचा पाठलाग करीत बाहेर आले आणि बेथ-कार पर्यंत त्यांना जिवे मारीत गेले.


छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते.


याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.


याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर.


तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील.


हे याहवेह, तुमच्या धमकीने तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले, आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.


त्यांनी आपल्या शत्रूंची दाणादाण केली आणि त्यांची कायमची फजिती केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan