Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ते म्हणाले, “जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका; त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापि तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हांला कळेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते म्हणाले, “तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 6:3
15 Iomraidhean Croise  

मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.


“बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला. “माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये.


गाढवाचे प्रथमवत्स कोकरू देऊन खंडणी भरून सोडवून घ्यावा, परंतु तो जर तुम्ही खंडणी भरून सोडविला नाही तर, त्याची मान मोडावी. तुमच्या सर्व प्रथम पुत्रांना खंडणी भरून सोडवावे. “कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाताने येऊ नये.


पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.


आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.


आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.


वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर हजर व्हावे: बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण व मंडपांचा सण. या प्रत्येक प्रसंगी याहवेहसमोर रिक्तहस्ते येऊ नये:


तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि म्हटले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश दूर पाठवून द्या; त्याच्या मूळ ठिकाणी त्याला जाऊ द्या, नाहीतर तो आम्हाला आणि आमच्या लोकांना जिवे मारेल.” कारण शहरात मृत्यूमुळे भय पसरले होते; परमेश्वराचा हात त्यावर फार भारी होता.


जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.”


परंतु त्यांनी कोश हालविल्यानंतर, याहवेहचा हात त्या शहराच्या विरुद्ध उठला आणि ते फार घाबरून गेले. परमेश्वराने त्या शहरातील लहान मोठ्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.


याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या,


परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan