Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,)

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते;

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 3:2
8 Iomraidhean Croise  

इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.” “बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला.


इस्राएलाची दृष्टी म्हातारपणामुळे अशक्त झाली होती, त्यामुळे तो नीट पाहू शकत नव्हता, म्हणून योसेफाने त्यांना त्याच्याजवळ आणले आणि त्याच्या पित्याने त्यांचे चुंबन घेतले व त्यांना कवटाळले.


परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.”


म्हणून यरोबोअमच्या पत्नीने त्याने सांगितल्याप्रमाणे केले व शिलोह येथे अहीयाहच्या घरी गेली. अहीयाह तर आता त्याच्या वयामुळे पाहू शकत नव्हता; त्याची दृष्टी मंद झाली होती.


आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे; आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे; परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात; लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो.


जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्‍या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्‍यांची नजर अंधुक होईल;


आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएल लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले.


एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan