Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा, मी इस्राएलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 3:11
11 Iomraidhean Croise  

म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील.


त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे; तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे.


जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल; रोज सकाळी, दिवसभर आणि रात्रभर, ते आरपार झाडत राहील.” हा संदेश समजून घेतल्याने अत्यंत भीती निर्माण होईल.


म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. चमत्कारानंतर चमत्कार करून; ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”


आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील.


“देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ— आणि अत्यंत आश्चर्यचकित हो. कारण आता मी तुझ्या काळात जे कार्य करणार आहे जरी ते तुला सांगितले तरी त्यावर तुझा विश्वास बसणार नाही.


भीतीमुळे लोक बेशुद्ध पडतील, जगावर काय घडून येणार आहे, या गोष्टीमुळे काळजीत पडतील. कारण आकाशमंडळ डळमळेल.


“ ‘निंदा करणार्‍यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’”


याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!” तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोला, तुमचा सेवक ऐकत आहे.”


तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan