Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 26:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा असे याहवेह माझ्या हातून घडवून न आणो. तर आता त्याच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण जाऊ या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचे माझ्याकडून न घडो; पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे; मग आपण निघून जाऊ.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 26:11
11 Iomraidhean Croise  

दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?”


कारण दावीद त्याला म्हणाला होता, “तुझ्या रक्ताचा दोष तुझ्याच डोक्यावर असो. जेव्हा तू असे म्हणालास की, ‘मी याहवेहच्या अभिषिक्ताला ठार मारले आहे,’ तुझ्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविरुद्ध साक्ष दिली आहे.”


तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?”


जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले.


वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा.


माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” असे प्रभू म्हणतात.


वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.


मी येथे तुमच्यापुढे उभा आहे. याहवेहच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या उपस्थितीत माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला आहे? मी कोणाचा गाढव घेतला आहे? मी कोणाला फसविले आहे? मी कोणावर अत्याचार केला आहे? न्याय विपरीत करण्यासाठी मी कोणाच्या हातून लाच घेतली आहे? यापैकी कोणतीही गोष्ट जर मी केली असेल तर त्याची मी भरपाई करेन.”


याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही.


दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.


तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan