१ शमुवेल 26:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दावीद आणखी म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्याला मारील अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल अथवा युद्धात त्याचा अंत होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 दावीद म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्यास मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल. Faic an caibideil |
जेव्हा दावीदाला कळले की, नाबाल मरण पावला आहे, तेव्हा तो म्हणाला, “ज्यांनी माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यांनी आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरले आहे त्या याहवेहची स्तुती असो. याहवेहने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर आणली आहे.” नंतर अबीगईलने त्याची पत्नी व्हावे म्हणून दावीदाने तिच्याकडे संदेश पाठवला.