Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा त्याने याहवेहला विचारले, “मी तिकडे जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” याहवेहने दावीदाला उत्तर दिले, “जा, पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाहला वाचव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा दाविदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” परमेश्वर त्याला म्हणाला, “जा, पलिष्ट्यांवर मारा करून कईलाचा बचाव कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:2
17 Iomraidhean Croise  

त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?” तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.” दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?” याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.”


तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.”


तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.


तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.”


याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन; माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.


याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही; ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत.


त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”


इस्राएली लोकांनी त्यांच्या अन्नसामुग्रींचा नमुना पाहिला, परंतु त्यांनी याबाबतीत याहवेहला विचारले नाही.


यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”


तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.”


तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.


परंतु दावीदाची माणसे त्याला म्हणाली, “येथे यहूदीयाच्या प्रदेशामध्ये असतानाच आम्हाला भीती वाटते, जर कईलाहकडे जाऊन आम्ही पलिष्ट्यांच्या सैन्याविरुद्ध गेलो तर किती अधिक धोका असेल!”


दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.”


(आता अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार दावीदाकडे कईलाह येथे पळून येताना त्याने आपल्याबरोबर एफोद आणला होता.)


आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan