Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जे सर्व निराशेत किंवा कर्जात किंवा असमाधानी होते ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि दावीद त्यांचा सेनापती झाला. सुमारे चारशे लोक त्याच्याबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:2
22 Iomraidhean Croise  

“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.


दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.


तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले.


तेव्हा दावीद आणि त्याची सुमारे सहाशे माणसे यांनी कईलाह सोडले आणि ते ठिकठिकाणी फिरत राहिले. जेव्हा शौलाला सांगण्यात आले की, दावीद कईलाहतून निसटून गेला आहे, तो तिकडे गेला नाही.


“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएल लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”


तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली.


म्हणून इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि तोब या देशात जाऊन राहिला. लवकरच त्याने गुंड लोकांची टोळी जमविली. त्या टोळीतले लोक त्याचे अनुयायी बनले व त्याच्याबरोबर राहू लागले.


हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे.


योहानाच्या काळापासून आतापर्यंत स्वर्गाचे राज्य मोठ्या शक्तीने पसरत आहे. आणि आवेशी लोक याचे अधिकार प्राप्त करीत आहेत.


ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या, जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या!


“परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्‍या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.


हूशाईने पुढे म्हटले, तुझे वडील आणि त्याची माणसे यांना तू चांगले ओळखतोस; ते योद्धे आहेत, रानटी अस्वलाची पिल्ले कोणी नेली तेव्हा ती कशी चवताळते त्यासारखे ते आहेत, तुझे वडील अनुभवी योद्धा आहेत; आणि तो सैन्याबरोबर रात्र घालविणार नाही.


मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”


त्यावर दानच्या लोकांनी उत्तर दिले, “आमच्यासोबत वाद घालू नकोस, नाहीतर काही माणसांना राग येईल आणि ते तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबीयांनी आपला जीव गमवावा लागेल.”


तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?”


संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचा भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan