Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 21:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे, आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवत आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे तिच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नकोस, मला अमुक ठिकाणी येऊन भेटा असे मी आपल्या चाकरांना सांगितले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 21:2
13 Iomraidhean Croise  

त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”


त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?” तो म्हणाला “होय, मीच आहे.”


त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)


अनाथोथ, नोब, अनन्याह,


असत्य मार्गापासून मला दूर ठेवा; तुमच्या कृपेनुसार आपल्या विधिनियमांचे मला शिक्षण द्या.


हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.


आज ते नोब येथे थांबतील; सीयोन कन्येच्या डोंगराकडे, यरुशलेमच्या टेकडीकडे ते त्यांच्या मुठी वळवतील.


याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर भोजन करीत असे. परंतु जेव्हा ते आले, तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला, कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते.


एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे.


शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”


तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.”


तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे.


परंतु शौलाच्या अधिकार्‍यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan