Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राणदानही करतो; तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:6
20 Iomraidhean Croise  

याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला.


इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”


कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती.


अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.


आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात; आम्हाला मृत्यूपासून वाचविणारे सार्वभौम याहवेहच आहेत.


असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल.


ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे; विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे;


याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील; त्यांची शरीरे उठतील— जे धुळीमध्ये पडून राहतात त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या— तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे; पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल.


यास्तव भविष्यवाणी कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे; मी तुम्हाला इस्राएल देशात परत आणेन.


याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?” मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.”


कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील.


येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल;


“आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.


परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan