Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 13:5
21 Iomraidhean Croise  

म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल,


“म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर.


जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते.


आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.


ते अयाथमध्ये प्रवेश करतात; ते मिग्रोनमधून पुढे जातात; ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात.


तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते. तुमची संतती धान्यकणासारखी अगणित असती; त्यांचे नाव कधीही मिटले नसते ना ते माझ्यासमोर कधी नष्ट झाले असते.”


मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,


शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे.


“हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.


“तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, रामाह येथे कर्णा वाजवा. बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.


यशायाह इस्राएलाविषयी उच्च वाणीने म्हणतो: “इस्राएलाची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणासारखी असली, तरी अवशिष्ट मात्र तारले जातील.


ते त्यांचे सैनिक, मोठ्या संख्येने घोडे आणि रथ घेऊन समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे एक मोठे सैन्य घेऊन बाहेर आले.


उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती.


यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले.


मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.


तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते,


शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.


अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.


शौलाच्या सर्व कारकिर्दीत इस्राएल व पलिष्ट्यांमध्ये घनघोर युद्ध होते, आणि जेव्हा शौलाला एखादा पराक्रमी किंवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या सेवेत सामील करीत असे.


पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली.


अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan