Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग जासुदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानांवर घातले; ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 11:4
15 Iomraidhean Croise  

एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला.


तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”


त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू.


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा; रडणार्‍यांबरोबर रडा.


जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात.


एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.


तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.


जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले,


इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?” याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”


मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली.


ते बेथेल येथे गेले, जिथे संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर बसून त्यांनी उच्चस्वरात शोक केला.


शौलसुद्धा ज्यांच्या हृदयास परमेश्वराने स्पर्श केला होता अशा शूर पुरुषांबरोबर गिबियाह येथे आपल्या घरी गेला.


शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.


नंतर शमुवेल रामाह येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिबियाहकडे परतला.


तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan