1 पेत्र 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याच कारणासाठी शुभवार्तेचा प्रचार जे आता मृत झाले आहेत त्यांना करण्यात आला होता, यासाठी की देहामध्ये त्यांचा न्यायनिवाडा मनुष्याच्या प्रमाणानुसार व्हावा परंतु आत्म्यामध्ये त्यांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जिवंत राहवे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यांनुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 म्हणूनच शुभवर्तमान मृतांनाही सांगण्यात आले होते, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवासमोर जगावे. Faic an caibideil |
ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.