Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्‍यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत स्वतःला विश्‍वसनीय निर्माणकर्त्याच्या स्वाधीन करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:19
27 Iomraidhean Croise  

“जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”


याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.


मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो; माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.


तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:


ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील.


जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”


माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”


तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.


ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.”


जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.


याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे.


कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत.


तुम्ही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असेल, तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा, चांगले करून दुःख सोसणे, अधिक चांगले आहे!


ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan