Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि, “जर नीतिमान लोकांचे तारण कष्टाने होते, तर अनीतिमान व पापी लोकांचे काय होईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 “नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, नीतिमान माणसाचे तारण होणे जर अवघड असते, तर भक्तिहीन व पापी लोकांची अवस्था काय होईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:18
27 Iomraidhean Croise  

सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.


जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!


माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’


“परंतु जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतील आणि त्यांनी दुष्ट व्यक्तीसारखे पाप करून अमंगळ कृत्ये केली, तर ते जगतील काय? त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाहीत. अविश्वासूपणामुळे ते दोषी आहेत आणि त्यांनी केलेल्या पापामुळे, ते मरतील.


हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”


आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते.


कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?”


त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले.


आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्‍या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’


परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.”


जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्‍या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो,


आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.


परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.


म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या.


नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे


यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या.


जो तुमचा विरोध करत नव्हता, त्या निष्पाप मनुष्याला तुम्ही दोषी ठरवून त्याचा वध केला.


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.


आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.


सर्वांचा न्याय करण्यासाठी आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतीमध्ये केली आणि अनीतिमान पाप्यांनी त्यांच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.”


आणि याहवेहने तुला एका कामगिरीवर पाठवित म्हटले, ‘जा आणि त्या दुष्ट अमालेक्यांचा पूर्णपणे नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध युद्ध कर.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan