Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे किंवा आकर्षक वस्त्रे घालणे या बाह्य गोष्टींवर तुमचे सौंदर्य केवळ अवलंबून नसावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे अशी बाहेरून दिसणारी नसावी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तुमचे सौंदर्य केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाख करणे असे बाहेरून दिसणारे नसावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:3
22 Iomraidhean Croise  

शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या.


“मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ “ती म्हणाली, ‘मी नाहोराचे पुत्र बेथुएलाची, ज्यांची माता मिल्का आहे, त्यांची कन्या आहे.’ “हे ऐकून मी तिच्या नाकात नथ आणि हातात पाटल्या घातल्या.


मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या.


नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली.


मग तिसऱ्या दिवशी एस्तेरने तिची शाही वस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतील अंगणात, राजदरबाराच्या अगदी समोर, जाऊन उभी राहिली. राजा राजदरबारात आपल्या राजासनावर, प्रवेशद्वाराच्या सन्मुख बसला होता.


राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत; तुझ्या उजवीकडे राणी उभी असून तिने ओफीरच्या सोन्याचे दागिने घातले आहेत.


इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.”


अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.”


जेव्हा लोकांनी हे निराशाजनक शब्द ऐकले, तेव्हा ते शोक करू लागले आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे दागिने घातले नाही.


ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले.


मग त्यांनी कास्याचे गंगाळ व त्याची बैठक सुद्धा कास्याची बनविली. सभामंडपाच्या दाराशी सेवा करणार्‍या स्त्रियांच्या आरशांचे ते बैठक होते.


ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.


मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.


एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का? तरी माझे लोक मला, असंख्य दिवसापासून विसरले आहेत.


हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.


“जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले.


या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.


कारण ते तुमच्या जीवनातील शुद्धता आणि आदर पाहतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan