3 कारण प्रभू चांगले आहेत याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे.
असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.
याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.
ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.
जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते.
ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील! धान्य तरुणांची आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल.
जेव्हा आपल्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रीती प्रकट होण्याची वेळ आली,