Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 प्रियजनहो, जे तुम्ही ह्या जगात परके व निराश्रित आहात, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 2:11
35 Iomraidhean Croise  

आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला.


“या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.”


आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.”


आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील.


या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे; तुमच्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेऊ नका.


मी कुठेही राहिलो तरी, तुमचे नियम माझ्या गीतांचे विषय झाले आहेत.


“याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची आरोळी ऐका; माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीवर प्रवास करणारा मी एक परदेशीय आणि वाटसरू आहे.


जर एखाद्या पुरुषाने स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवले आणि या प्रक्रियेत त्याचे वीर्यस्खलन झाले, तर दोघांनीही पाण्याने स्नान केले पाहिजे. ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.


“ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात.


“सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल.


फक्त त्यांना एवढेच लिहून कळवावे की, त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून आणि गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि रक्ताचे सेवन करण्यापासून स्वतःला दूर ठेवावे.


मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा.


यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल.


पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.


कारण तुम्ही देहस्वभावाप्रमाणे वागत राहिला, तर मराल. पण पवित्र आत्म्याच्या शक्तीने दैहिक कुकर्मे नष्ट केलीत, तर जगाल.


आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवितो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या.


परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका.


यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्‍या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.


जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे.


या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात.


प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे.


तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग.


ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते.


जरी आम्ही असे बोलत असलो तरी, प्रिय मित्रांनो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा चांगल्या व तारणाबरोबर येणार्‍या गोष्टींची खात्री आहे.


तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय?


पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून, पंत, गलातीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात हद्दपार होऊन विखुरलेल्या आणि परमेश्वराच्या निवडलेल्यांना,


तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता, ते प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा निःपक्षपातीपणाने न्याय करतात, म्हणून या जगात तुमचे जीवन परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा.


प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्नीसारख्या वाईट अनुभवांबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे.


याचा परिणाम असा होतो की, त्यांचे उरलेले ऐहिक जीवन ते मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात.


प्रिय मित्रांनो, आता माझे हे तुम्हाला दुसरे पत्र आहे. या दोन्ही पत्राद्वारे मी तुम्हाला आठवण देऊन तुमच्या विचारांना हितकारक होतील अशा गोष्टींना चालना देत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan