Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3-5 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:3
56 Iomraidhean Croise  

तेव्हा राजाने म्हटले: “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीद, यांना स्वतःच्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,


नंतर दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुमच्या याहवेह परमेश्वराची स्तुती करा.” म्हणून त्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे याहवेह परमेश्वराची मस्तके लववून, दंडवते घालून, त्यांचा राजा याहवेहची स्तुती केली.


जेव्हा हिज्कीयाह आणि त्याचे अधिकारी आले आणि त्यांनी तो ढीग पाहिला, तेव्हा त्यांनी याहवेहची स्तुती केली आणि त्यांच्या इस्राएली लोकांना आशीर्वाद दिला.


इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो. आमेन आणि आमेन.


परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.


हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.


आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड,


याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील; त्यांची शरीरे उठतील— जे धुळीमध्ये पडून राहतात त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या— तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे; पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल.


त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.


ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.


आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.


तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.


त्यांना आपल्या पापांसाठी मरणाच्या स्वाधीन करण्यात आले आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठविले गेले.


आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!


आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.


आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहोत. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल?


विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.


परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो.


जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.


माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा.


परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.


त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन


परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे,


आता जे आपल्या सामर्थ्यानुसार आमच्यामध्ये कार्य करीत आहेत आणि आमच्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे अधिक विपुलतेने करण्यास समर्थ आहेत,


जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, मी पौल, त्या शुभवार्तेचा सेवक झालो आहे.


त्यांना परमेश्वराने यासाठी निवडले की, त्यांच्या गौरवाच्या संपत्तीचे रहस्य, म्हणजे तुमच्या गौरवाची आशा, जे ख्रिस्त तुम्हामध्ये आहेत, त्यांना गैरयहूद्यांमध्ये प्रकट करावे.


आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.


बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये.


ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त,


ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे.


आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी.


परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.


त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.


म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा.


त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे.


कारण नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, जिवंत आणि सर्वकाळ टिकणार्‍या परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमचा नवीन जन्म झाला आहे.


नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.


ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा.


ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते.


कारण पूर्वीच्या काळातील पवित्र स्त्रिया ज्यांची परमेश्वरावर आशा होती, त्या अशाच प्रकारे स्वतःला सजवित असत. त्यांनी स्वतःला त्यांच्या पतीच्या अधीन केले होते,


जर तुम्हाला माहीत आहे की ते नीतिमान आहेत, तर तुम्हाला हे माहीत आहे की, प्रत्येकजण जे काही चांगले करतात तो त्यांच्यापासून जन्मला आहे.


ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत.


ज्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे, ते पाप करीत राहत नाही, कारण त्यांच्याठायी परमेश्वराचे बीज राहते; म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण त्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे.


प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात.


येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात.


आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही.


कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan